८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ८ मार्च १८५७ साली न्यूयॉर्कच्या शिलाई कामगार असलेल्या महिलांनी कामातल्या शोषणा विरुद्ध आवाज उठवला आणि पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून स्वत:च्या हक्कासाठी संघटीत झाल्या आणि तेव्हा पासून हा प्रेरणादायी दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
गौतम बुद्धांनी स्त्री मुक्ती साठी पहिले पाहुल उचलले. त्यानंतर ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीच्या शिक्षणासाठी व स्त्री मुक्तीसाठी आशेचे किरण दाखवले आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात स्त्रियांना समानतेने वागविले जात नाही म्हणून त्यांना कायदेशीर हक्क व अधिकार मिळवून दिला.
पण या सगळ्याने आजची स्त्री सुरक्षित आहे का ? हा प्रश्न मनात येतचं असतो. स्त्री एक मुलगी, बहिण, सून, आई, वहिनी, मैत्रीण, काकी, मावशी, आजी या भूमिका सहज रित्या पार पाडते. ती शिक्षित असो किंवा अशिक्षित पण ती संसारातले किंवा व्यवहारातले प्रश्न चुटकीनिशी सोडवते. आयुष्य भर पूर्ण घर सांभाळणारी गृहिणी, सगळ्यांनसाठी रुचकर जेवण बनवणारी अन्नपूर्णा, शिक्षणाचे धडे शिकवणारी सरस्वती, चालायला बोलायला आणि संस्कार देणारी आई, सगळ्यांची काळजी घेणारी देवी, पतीला साथ देणारी अर्धांगिनी घरावरील आलेल्या संकटाला सामोरे जाणारी रक्षिका अशी ही स्त्री जी निस्वार्थ मनाने या भूमिका सहज रित्या पार पाडते.
आजची स्त्री म्हणजे सुंदर आवाज असणारी गाणकोकिळा "लता मंगेशकर", पंतप्रधान "इंदिरा गांधी”, IPS ऑफिसर "किरण बेदी" आणि अंतराळात पोचलेली "कल्पना चावला" यांनी दाखवून दिले आहे की कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. तरी पण स्त्रियांना पाहिजे असलेले मान-सन्मान, प्रतिष्ठा त्यांना मिळत नाही त्यांचा वाटेला येतो तो फक्त अपमान, अपमान आणि अपमान......
पहिला स्त्रीला वयात येण्या आधीच तिचा विवाह करण्यात यायचा, बाहुलीचा खेळ मांडण्याएवजी आयुष्याचा खेळ मांडावा लागायचां. हुंडा न दिल्यामुळे सासरचे टोमणे एकावे लागायचे, तिला जिवंत पणीच मरणयातना भोगाव्या लागायच्या, आता जग जरी बदलले असेल पण या गोष्टी बदल्या आहेत का ? बालवधू, हुंडा या सारख्या गोष्टी अजून ही थांबल्या नाहीत. कित्येक स्त्रिया या त्रासाला अजूनही बळी पडत आहेत.
एक संस्कृत मधले वचन आहे " यत्र नार्यस्तु पुज्यते, रमन्ते तत्र देवता" याचा अर्थ जिथे स्त्रियांना आदर दिले जाते आणि पूजले जाते तिथे देवाचे स्थान असते. पण या समाजात अजून सुद्धा स्त्रियांना मान, आदर दिला जात नाही. मंदिरात जसे काळीमाता, दुर्गा, लक्ष्मी यांना पूजले जाते पण यांचे रूप घेऊन आलेली स्त्री फक्त विटंबना सहन करते. याला कारण कोण समाज की स्त्री?
मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परक्याचे धन का मानले जाते? जिकडे मुलाला वंशाचा दिवा मानला जातो तिकडे मुलीला वंशाची पणती का नाही मानले जात. पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रारंभ कुटुंबात आईपासून सुरु होते तरी आजही भ्रुण हत्या होत आहे, आई पासून आपले लेकरू हिसकावले जात आहे. पण हे दु:ख या समाजाला कळणार नाही. हे दु:ख कळेल ते फक्त शेतकऱ्याला कारण तो ही आपले पिकं लेकरासारखे वाढवतो आणि एक वैराचा दिवस येतो मुसळधार पावसाच्या वादळामुळे त्याचे पिकं उध्वस्त करून जातो.
आजची स्त्री ही शिक्षणाच्या प्रभावाने धीट झाली, चार भिंत ओलांडून घराबाहेर पडली, पण ती सुरक्षित आहे का ? आजच्या युगात स्त्री ही पुरुषसमानता मानली जाते, पण तिला तोच आदर आणि मान मिळतो का ? आजही काही महिला बऱ्याच अनिष्ट प्रथा रूढी आणि परंपरा मध्ये गुरफटत आहेत. आज स्त्रीची दशा अशी आहे मग पुढे त्यांची दिशा काय असेल....

लेख : जानवी पाटील.
#Post_01
खुप सुंदर लिहले आहे मज्या प्रोजेक्ट मधे मि हेच लिहले
ReplyDeleteDhanyavad
DeleteChan
ReplyDeleteखूपच छान मी हे भाषण घेतलं
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteअप्रतिम आहे
ReplyDeleteखुप छान लिहिले आहे मी माझ्या प्रोजेक्ट मधे पन आसेच लीहिले आहे
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete